फोर्स’च्या दोन नवीन एसयुव्ही कार बाजारात दाखल

चेन्नई – पुण्यातील अ‍ॅटोमोबाईल कंपनी फोर्स वन मोटर्सने मंगळवारी विशेष उपयोगी वाहन (एसयुव्ही) च्या दोन नवीन कारचे चेन्नई येथे एका कार्यक्रमात अनावरण केले आहे. फोर्सवन इ.एक्स आणि एस. एक्स अशी ही दोन मॉडेल आहेत.

या नवीन वाहन प्रकरातील ही दोन्ही वाहने एसयुव्ही प्रकारातील सर्वात स्वस्त तसेच महाग किंमतीची आहेत. या वाहनांना बाजारात उतरवताना फोर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन फिरोदिया यांनी सांगितले, की या वाहन प्रकारातील सर्व मुल्यश्रेणीतील वाहने आम्ही उपलब्ध करुन देणार आहोत.

यातील सर्वात जास्त किंमत असलेली तीसरी कार आम्ही महिन्याभरात बाजारात उतरवत आहोत. फोर्सने 19 महिन्यांपूर्वी प्रवासी वाहनांमध्ये आपले पहिले पाऊल ठेवले होते. आता पर्यंत फोर्स वनची 2600 वाहने विकली गेली आहेत. तर कंपनीला या वर्षाशेवटपर्यंत आपल्या डिलर्सची संख्या वाढवायची असून ती 25 वरुन 50 वर नेण्याचा उद्देश असल्याचेही फिरोदिया यांनी सांगितले आहे.’

या नवीन वाहनांमध्ये फोर्स वन एस.एक्स.मध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेक, फोर्स डिस्ट्रीब्यूशन, रिव्हर्स पार्कींग सेंसर आणि कातड्याचे सीट आदी सुवीधा देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment