पर्यटनात महाराष्ट्र आघाडीवर

mtdc3
पुणे – परदेशी पर्यटकांना आकृष्ट करण्याच्या बाबतीत महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन खात्याने २०१२ या वर्षातील पर्यटनाशी संबंधित आकडेवारी प्रसिध्द केली असून परदेशी पर्यटकांनी भेट दिलेल्या राज्यातील टॉप टेन राज्यांची नावे आणि आकडेवारी प्रसिध्द केली आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत ङ्गारच पुढे आहे. महाराष्ट्राला भेट दिलेल्या परदेशी पर्यटकांची २०१२ सालची संख्या ५१ लाख एवढी आहे. त्या पाठोपाठ तामिळनाडूचा क्रमांक असून या राज्याला त्या वर्षात ३६ लाख पर्यटकांनी भेट दिलेली आहे. टॉप टेन राज्यातली अन्य राज्ये महाराष्ट्राच्या ङ्गार मागे आहेत.

पर्यटन विकास खात्याने या संबंधात दिलेल्या माहितीनुसार २०१२ साली २३ लाख पर्यटकांनी दिल्लीला, २० लाख पर्यटकांनी उत्तर प्रदेशाला तर १५ लाख पर्यटकांनी राजस्थानला भेट दिलेली आहे. अन्य राज्यांची आकडेवारी अशी आहे. पश्‍चिम बंगाल १२ लाख, बिहार ११ लाख, केरळ ८ लाख, कर्नाटक ६ लाख आणि हिमाचल प्रदेश ५ लाख. २०११ सालीसुध्दा परदेशी पर्यटकांनी भेट दिलेल्या राज्यांची टॉप टेन यादी अशीच होती.

देशांतर्गत पर्यटनाच्या बाबतीत २०१२ साली मोठी वाढ झाली. भारतातील १० कोटी ३६ लाख पर्यटकांनी देशातल्या विविध पर्यटन केंद्रांना भेटी दिल्या असे आढळले. २०११ साली ही संख्या ८ कोटी ६५ लाख होती आणि २०१० साली ७ कोटी ४८ लाख होती. म्हणजे भारतातल्या भारतात पर्यटक म्हणून ङ्गिरणार्‍या लोकांची संख्या दरसाल वाढत आहे.

Leave a Comment