दोन वर्षे कसे गेले समजले नाही-धोनी

मेलबर्न- वेळ कसा निघून जातो हे समजतच नाही. विश्वचषक जिंकून दोन वर्ष पूर्ण झाली. मात्र अजून पण आम्ही काही दिवसापूर्वीच विश्वचचषक जिंकला आहे असे वाटते. आता नवीन विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक आले आहे. त्यामुळे हे दोन वर्षे कसे गेले समजले नाही असे मत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी व्यक्त केले.

२०११ चा विश्वचषक आम्ही जिंकला या गोष्टीला आज दोन वर्षे उलटून गेली असली तरी हे सर्व नुकतंच घडलंय असे वाटते. खरेच वेळ कधी निघून गेला ते कळलेच नाही. विश्वचषक हा प्रत्येक खेळाडूसाठी ‘खास टुर्नामेंट’ असते. कारण प्रत्येक चार वर्षांनंतर हा ‘क्रिकेटचा महाकुंभ’ भरत असतो. २०११ साली मुंबईत झालेला विश्वअचषक माझ्या संघाने जिंकला होता. आगामी काळात पण हे जेतेपद आमच्याकडेच राहावे यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेणार आहोत, असेही कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हणाला.

सध्या टीम इंडियाची घडी नीट बसली आहे. संघातील प्रत्येक खेळाडूला त्याला काय करायचे आहे हे पक्के ठाऊक आहे. संघातील प्रत्येक स्थानासाठी प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे प्रत्येक जण टिकून राहण्यसाठी कष्ट घेत आहे. नुकतीच आम्ही ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ व विंडीजमधील तिरंगी मालिका जिंकली आहे. सध्या टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेमध्ये ‘सरस’ कामगिरी करीत आहेत. त्यामुळे आगामी विश्वचचषकासाठी आमचे खेळाडू सज्ज असतील, असे धोनीने यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

Leave a Comment