दीर्घकाळ स्तनपान मिळणारी मुले अधिक बुद्धिमान

बोस्टन – दीर्घकाळ स्तनपान मिळणारी मुले अधिक बुद्धिमान होतात असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात दिसून आले आहे. बोस्टन चिल्डेन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणार्‍या मँडी बेलफोर्ट यांनी हे संशोधन केले आहे.

मँडी यांनी ३ ते ७ वयोगटातील मुले आणि त्यांना मिळालेल्या स्तनपानाचा कालावधी अशा स्वरूपात हे संशोधन केले तेव्हा त्यांना असे आढळले की दीर्घकाळ स्तनपान मिळालेल्या मुलांमध्ये वयाच्या तिसर्‍या वर्षातच भाषेचे आकलन अधिक चांगले होते तर सात वर्षांच्या मुलंमध्ये व्हर्बल बरोबरच नॉन व्हर्बल आयक्यू सर्वसामान्य मुलांच्या सरासरीपेक्षा किमान चार पॉईटने अधिक होता.

दीर्घकाळ म्हणजे किमान वर्षभर स्तनपान मिळालेल्या या वयोगटातील मुले अधिक चुणचुणीत होती. १ वर्षे स्तनपान मिळालेल्या मुलांचा सातव्या वर्षातील व्हर्बल आयक्यू सरासरीपेक्षा चारने अधिक होताच पण त्यानंतर अधिक स्तनपान मिळालेल्या प्रत्येक महिन्यानुसार त्यात ०.३५ पॉईंटची वाढ होत असलेलीही दिसून आले. हीच वाढ नॉन व्हर्बल आयक्यूमध्ये ०.२९ पॉईंट इतकी होती असे मँडी यांचे म्हणणे आहे.हे संशेाधन जेएएमए या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment