गुजरातच्या पर्यटनात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा

gujarat
मुंबई – गुजरातच्या पर्यटन विकासाचे अनेक प्रयत्न केले जात आहेत आणि अधिकाधिक पर्यटकांनी गुजरातला भेट द्यावी असा तिथल्या राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्याला महाराष्ट्रातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून गुजरातला भेट देणार्‍या पर्यटकात मराठी पर्यटकांची संख्या सर्वात मोठी आहे. २०१२-१३ साली महाराष्ट्रातल्या १८ लाख ८० हजार पर्यटकांनी गुजरातला भेट दिली. त्या राज्याला भेट देणार्‍या पर्यटकांमध्ये या मराठी पर्यटकांचे प्रमाण ३५ टक्के एवढे होते. गुजरातचे पर्यटन विकास मंत्री सौरभ पटेल यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

२०१२-१३ या वर्षात देश विदेशातल्या २ कोटी ५४ लाख पर्यटकांनी गुजतरातमधील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. २०११-१२ पेक्षा हे प्रमाण १३.६ टक्क्यांनी जास्त होते. असेही पटेल यांनी सांगितले. चालू वर्षी अनेक कल्पकतापूर्ण उपक्रमाद्वारे अधिक पर्यटकांना आकृष्ट करण्याचा तिथल्या राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे पटेल म्हणाले.

३ ऑगस्ट रोजी गुजरातमध्ये मान्सून महोत्सव सुरू होईल. तो सापुतारा या थंड हवेच्या ठिकाणी भरवला जाईल. सापुतारा हे ठिकाण जळगाव जिल्ह्याच्या जवळ आहे आणि तीन धबधब्यांच्या प्रदेशात आहे. गिरा, मायादेवी आणि गिरमल हे तीन धबधबे सापुतार्‍याच्या जवळ आहेत. ९ आणि १० सप्टेंबर असे दोन दिवस तारणेतार ङ्गेअर भरवले जाईल. त्यामध्ये लोकनृत्य, लोकसंगीत यांचे दर्शन घडवले जाईल. नवरात्री महोत्सव आणि रन उत्सव असेही काही उत्सव पर्यटन विकासाचा दृष्टिकोन ठेवून आखले जातील असेस पटेल यांनी सांगितले.

Leave a Comment