आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली – आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज आरोपपत्र दाखल केलं. दिल्लीच्या साकेत कोर्टात पोलिसांनी 200 पानांचं आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा शकील तसंच क्रिकेटर एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना आरोपी बनवण्यात आलं आहे. तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहुल द्रविड आणि हरमीत सिंग यांना साक्षीदार बनवण्यात आलं आहे.

आरोपपत्रात राजस्थान रॉयल्सचे खेळाडून श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण हे नेहमी फोनवरून एकमेकांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवाय अजित चंडिलाकडून जप्त करण्यात आलेल्या महागड्या गिफ्ट्सचाही उल्लेख यात आहे.

एकूण 38 आरोपींची आरोपपत्रात नावं असून त्यातील 29 जण अटकेत आहेत. तर दोन पाकिस्तानी आरोपींसह 9 जण फरार आहेत.

Leave a Comment