१० भारतीय अमेरिकनांना रिपब्लीकन पक्षाची उमेदवारी

वॉशिग्टन दि.३१ – पुढील वर्षात म्हणजे २०१४ मध्ये होत असलेल्या काँग्रेस निवडणुकांसाठी अमेरिकेतील रिपब्लीकन पक्षाने १० भारतीय अमेरिकन नागरिकांना निवडणूक मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचा चेहरा बदलणे व पक्षात विविधता आणणे याचबरोबर आर्थिक दृष्ट्या संपन्न भारतीय अमेरिकन नागरिकांचे पक्षाला समर्थन मिळविणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे असे सांगितले जात आहे.

नॅशनल रिपब्लीकन काँग्रेशनल कमिटी, भारतीय अमेरिकी कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष शलभ कुमार या संदर्भात बोलताना म्हणाले की विविध क्षेत्रे आणि राज्यातून आत्तापर्यंत पक्षाने सहा भारतीय अमेरिकन उमेदवारांची नांवे निश्चित केली आहेत. त्यांचे सध्या प्रशिक्षण सुरू असून ते संपल्यानंतर ही नांवे जाहीर केली जातील. इलिनॉय, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया या राज्यातून प्रत्येकी दोन तर व्हर्जिनिया व मेरिलँड या राज्यातून प्रत्येकी १ सीट अशा १० सीटवर भारतीय अमेरिकन लोकांची उमेदवारी जाहीर केली जाणार आहे.

देशात सध्या ३५ लाखांहून अधिक भारतीय अमेरिकन असून त्यातील सर्वात जास्त नागरिक डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक आहेत. मात्र भारतीय अमेरिकन गव्हर्नर बॉबी जिंदल आणि निक्की हेली हे मात्र रिपब्लीकन पक्षाचे आहेत.

Leave a Comment