मेलबर्न – यंदा होणार्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलँडमध्ये 14 फेब्रुवारी ते 29 मार्च 2015 दरम्यान आयसीसी क्रीकेट विश्वचषकात गत विजेता भारताचा पहिल्या फेरीत पाकिस्तानसोबत पहिला सामना आहे.
विश्वचषक 2015 – भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत
या खेळांच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानला एकच गट बी मध्ये ठेवण्यात आले आहे, तर भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानसोबत 15 फेब्रुवारी 2015 ला होणार आहे. तर भारत आतापर्यंत कोणत्याही विश्वचषक सामन्यांमध्ये पाकिस्तानकडून हारलेला नाही हे महत्तावचे आहे. या क्रीकेट विश्वचषकात 2015 मधील सामने एकूण 14 शहरांमध्ये खेळले जाणार आहे.
यामध्ये अंतिम सामनाधरुन ऑस्ट्रेलियामध्ये या सामन्यांपैकी एकूण 26 सामने खेळले जातील. यामध्ये एडलिड, ब्रिस्हेन, कॅनबेरा, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी यांचा समावेश आहे. तर न्यूझिलँडध्ये यापैकी 23 सामने खेळली जाणार असून यामध्ये ऑकलँड, क्राईस्टचर्च, डुनेडिन, हॅमिल्टन, नेपियर, नेल्सन आणि वेलिंग्टन येथे होतील.
तर या सामन्यांमध्ये सर्व नॉकआऊट सामन्यांसाठी एक दिवस आरक्षितही करण्यात आला आहे. भारताचा पहिला सामना 15 फेब्रूवारीला एडलिडमध्ये पाकिस्तान सोबत असेल. तर दूसरा लीग सामना हा 22 फेब्रुवारीला भारत व दक्षिण आफ्रिके यांच्या दरम्यान होणार आहे.
28 फेब्रुवारीला पर्थच्या मैदानावर भारताचा क्वालिफायर सोबत सामना असेल. तर भारताचा चौथा सामना वेस्टइंडिजसोबत 6 मार्चला पर्थमध्येच असणार आहे. तर शेवटचे दोन सामन्यांमध्ये 10 मार्चला हॅमिल्टनमध्ये आर्यलँडसोबत तर 14 मार्चला ऑकलँडमध्ये झिम्बॉम्बेसोबत असणार आहे.