लघवीच्या स्टेमसेल्समुळे दात उगवले

teeth
लंडन – एखाद्या व्यक्तीच्या लघवीतील स्टेमसेल्सचा वापर केल्यास त्याचे पडलेले किंवा काढून टाकलेले दात पुन्हा उगवू शकतील अशी आशा काही चिनी शास्त्रज्ञांनी उंदरांवर केलेल्या प्रयोगाच्या यशावरून व्यक्त केली आहे. त्यांनी या स्टेमसेल्सचा वापर केलेल्या उंदरांच्या पडलेल्या दातांच्या ठिकाणी नव्या दातासारखे दात उगवल्याचे आढळून आले आहे. चीनमधल्या ग्वांगझाऊ इन्स्टिट्यूट ऍन्ड हेल्थ या संस्थेत करण्यात आलेल्या या प्रयोगाच्या ङ्गलनिष्पत्तीची माहिती बीबीसी न्यूजवरून देण्यात आली आहे.

माणसाच्या शरीराबाहेर ङ्गेकल्या जाणार्‍या स्त्रावांमधून काही वेळा काही विशेष पेशी प्राप्त केल्या जातात आणि प्रयोगशाळेमध्ये अशा पेशी जमा करून त्यापासून स्टेमसेल्स तयार केले जातात. असे स्टेमसेल्स आणि उंदरांच्या शरीरातून प्राप्त झालेले घटक यांचे मिश्रण करून ते उंदरांच्या पडलेल्या दातांच्या जागी लावले असता तीन आठवड्यात त्या जागेवर दात उगवलेले दिसले.

त्यांना नेमके दातच म्हणावे की नाही हाच एक वादाचा मुद्दा आहे. कारण हे कथित दात मूळ दातांपेक्षा मऊ आहेत. मात्र मऊ असले तरी त्यांचा वापर दातांसारखा होत असेल तर या प्रयोगाला यश आले असेच म्हणावे लागेल. तूर्तास तरी उंदरांवर यशस्वी झालेला प्रयोग माणसांवर करण्यासाठी आणि एक दशक तरी लागेल असा संशोधकांचा दावा आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते हा दातासारखा दात असला तरी त्याला कीड लागण्याची शक्यता जास्त आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment