मुंबई – डॉलरच्या तुलनेत रुपयाची गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली घसरण केंद्र सरकारने काही उपाय योजिले असूनही सुरूच राहिली आहे. मंगळवार दि. ३० जुलै रोजी रुपया आणखी घसरला आणि डॉलरची किंमत ६१ रुपये १२ पैसे अशी झाली. ही घसरण अशीच जारी राहिल्यास महागाई वाढण्याची भीती आहे. येत्या एक-दोन दिवसातच या घसरणीचा परिणाम म्हणून पेट्रोलचे दर वाढण्याचा संभव आहे.
रुपयाची घसरण सुरूच
रुपयाची काल झालेली घसरण ही चिंताजनक असली तरी ती विक्रमी नाही. विक्रमी घसरण आठ जुलै रोजी झाली होती आणि त्या दिवशी एका डॉलरला ६१ रुपये २१ पैसे असा रुपया गडगडला होता. जागतिक बाजारपेठेमध्ये केवळ रुपयाच नव्हे तर जगातल्या बहुतेक सार्या चलनांच्या तुलनेत डॉलर मजबुत झाला आणि भारताच्या शेअर बाजारामध्ये निराशाजनक सुरूवात झाली. त्यामुळे ही घसरण सुरू राहिली.