बिग बॉससाठी सलमान घेणार १३० कोटी

आगामी काळात बिग बॉसच्यास शो मध्ये बॉलीवूडचा टायगर सलमान ‘फ़रिश्ते’ आणि ‘शैतान’ च्‍या अवतारात झळकणार आहे. त्याचमुळे सर्वांना सलमान ख़ानच्या स्टार पावरचा अंदाज आला असेल. त्यामुळेच आगामी काळात काम करताना सलमानने त्याच्या शो ची फ़ीस देखील वाढवली आहे. सलमान ख़ानने ‘बिग बॉस-७’ च्या एका एपिसोडसाठी पाच कोटी रूपये मानधन घेतले आहे. एकूण २६ शो होणार असून त्यासाठी १३० कोटी रूपये मानधन घेतले आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार बॉलीवुडचा ‘दबंग ख़ान’ सलमानला बिग बॉसच्या एका इपिसोडसाठी पाच कोटी म्हणजे सर्व भागासाठी १३० कोटी रूपये मिळणार आहेत. हे करीत असताना सलमानने मानधनाच्या बाबतीत सर्वांना मागे टाकले आहे. त्याच्या या मानधनामूळे अनेक सुपरस्टार्स देखील मागे पडले आहेत.

यापूर्वी आमिर ख़ान, शाहरुख ख़ान, ऋतिक रोशन आणि अमिताभ बच्चेन सारख्या सिता-यांना एका शोसाठी दोन ते तीन कोटी रुपये मिळतात. मात्र या सीनसाठी सलामानने सवार्धिक मानधन घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्याने त्यायची बॉलीवूडमधील स्टार पावर सिध्द केली आहे. बॉलीवुडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.

Leave a Comment