तेलंगणावरून काँग्रेस खासदाराचा राजीनामा

नवी दिल्ली- तेलंगणच्या निर्मितीवरून काँग्रेसच्या एका खासदारांसह तीन आमदारांनी राजीनामा दिला आहे. स्वतंत्र तेलंगणची घोषणा केल्यानंतर या निर्णयामुळे काँग्रेस चांगलेच अडचणीत सापडले आहे. आंध्र प्रदेशमधील गुंटूरचे खासदार रायपति संबाशिवा राव यांनी या निर्णयाचा निषेध करत आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. स्वतंत्र तेलंगणाच्या निर्णयाला युनायटेड आंध्रप्रदेश चळवळीच्या समर्थकांनी विरोध केला असून बुधवारी आंध्रमध्ये बंदचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आले आहे.

मंगळवारी कॉग्रेस कार्यकारिणी आणि सत्ताधारी संपुआच्या सर्वच घटक पक्षांनी स्वतंत्र तेलंगणच्या निर्मितीवर एकमताची झाल्याने देशातील २९ वे राज्य म्हणून असिस्तंवात येणार आहे. तेलंगणच्या घोषणेनंतर एका दिवसातच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. आंध्र प्रदेशमधील गुंटूरचे खासदार रायपति संबाशिवा राव यांनी या निर्णयाचा निषेध करत आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे आंध्रप्रदेशातही तणावाचे वातावरण असून राज्याच्या किनारपट्टी भागांमध्ये बंद पाळण्यात आला असून राज्यात ठिकठिकाणी निदर्शनेही करण्यात येत आहेत.

राव यांच्यासोबत पक्षातील सी. आदि नारायण रेड्डी, पी. सतीशकुमार आणि टी. त्रिमुरथुलु या तिघा आमदारांनीही राजीनामा दिला असून आंध्र काँग्रेसचे प्रवक्ते तुलसी रेड्डी यांनीही या निर्णयाला विरोध जाहीर करत राजीनामा दिला आहे.

Leave a Comment