उत्तराखंड आपत्तीमुळे पर्यटन क्षेत्राला 250 कोटींचा फटका

uttarakhand
उत्तराखंड – उत्तराखंडच्या केदारनाथ क्षेत्रात आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा फटका येथील पर्यटन व्यवसायाला बसला असून पर्यटकांनी या पर्यटन क्षेत्राकडे पाठ फिरवल्यामुळे येथील पर्यटन व्यवसायाला 200-250 कोटींचा फटका बसला आहे. मागील महिन्यात उत्तराखंडमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे इथल्या कुमौन क्षेत्रातील पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.

कुमौनला महापुरामुळे कसलेच नुकसान झाले नसतानाही पर्यटकांनी या ठिकाणाकडे पाठ फिरवली आहे. तर नैनितालमध्येही अनेक पर्यटकांनी केलेली अ‍ॅडव्हान्स बुकींग रद्द केली आहे. यावेळी दिवसांत नैनितालमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असते परंतु सद्या इथे एकही पर्यटक फिरकत नसून सदैव बोटींनी भरलेला नैनी तलाव ही खाली खाली दिसत आहे. तसेच येथील मॉल रोड व सर्व हॉटेल्सही पर्यटकांच्या प्रतिक्षेत आहे.

पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे पर्यटकांना बोटीने नौकाविहार करून पोट भरणार्‍या सर्व बोटमनांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. यावेळी वर्षाच्या मध्य सिझनमध्येच ही आपत्ती आल्यामुळे बोटमनच्या व्यवसायावर मोठे संकट ओढावले आहे. तर नावीकांसमोर दोनवेळच्या अन्नाचा प्रश्न आ वासून उभा असून त्यांच्या मुलांचे शिक्षणही धोक्यात आले आहे.

बोटमन रमेश जोशी यांनी सांगितले की, पुर्वी आम्ही जे 100-50 रुपये कमावत होतो, आता ते ही बंद झाले आहे. घरात सध्या जेवढे साठवलेले होते तेवढ्यावरच सध्या आमचा उदरनिर्वाह चालू आहे. उत्तराखंडनंतर पर्यटकांनी या भागाकडे पाठ फिरवली आहे. या दिवसांमध्ये आम्ही जे कमावत होतो त्यावर आमचे वर्षभर कुटुंब चालत होते. परंतु उत्तराखंड आपत्तीनंतर आमच्या रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे.

मुलांनाही आम्ही शाळेत पाठवू शकत नाही, तसेच त्यांची पुस्तकंही विकत घेण्याची परिस्थितीही उरलेली नाही. तर दुसरीकडे नैनितालचे सर्व हॉटेल, रस्ते, तलाव हे सर्व पर्यटकांच्या प्रतिक्षेत आहेत. वीकेंडला या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते, परंतु आता सर्व चित्र पालटले आहे. नैनिताल हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष

दीनेश शहा यांनी दिलेल्या माहितीत नैनिताल पर्यटन क्षेत्राला यंदा 200-250 कोटींचा तोटा झाला आहे. शहा यांनी सांगितले की, 15-16 जुनला आलेल्या नैसर्गिक आपत्तीवेळी आमचे सर्व हॉटेल पर्यटकांनी भरले होते. परंतु आता इथे एकही पर्यटक फिरकत नाही. पर्यटक येथे येण्यास घाबरत आहेत. तर सरकारकडूनही काही महत्त्वाची सुचना येत नाही.’ तर येथील कैलास मानसरोवर यात्रा तसेच ट्रेकींग रद्द झाल्यानेही निगमला कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.

कुमौन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथोरिटीचे एम.डी. दीपक राव यांनी सांगितले की, या आपत्तीमुळे कुमौन मंडळ विकास निगमचेही मोठे नुकसान झाले आहे. पर्यटक न आल्याने इथे 9.92 कोटींचे नुकसान झाले असून 4.41 कोटींच्या मालमत्ते नुकसान झाले आहे. आमचे ट्रेकींग रुट्स कैलास यात्रा, आदी कैलाश, धर्म व्हॅली आणि पिंडारी ट्रॅक पुर्णपणे बंद झाल्याने तीथे कुठल्याच प्रकारची ट्रॅकींग होत नसून कसलीच बुकींग अद्याप झालेली नाही.

ज्या ठिकाणी विकेंडला बुकींग फुल होत होती आज त्या ठिकाणी एकही पर्यटक येत नाही.’

Leave a Comment