लंडन – ब्रिटनमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हे 1985मध्ये अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या त्यांच्या प्रचंड गाजलेल्या पुस्तकाचे लेखन करत असतानाच , त्यांची प्रकृती अचानक एवढी बिघडली होती की , ते जवळजवळ मरणाच्या दारात पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्या डॉक्टरांनी त्यांच्या यातना संपवण्यासाठी त्यांची जीवरक्षक प्रणाली काढून टाकण्याचासल्ला दिला होता.
आपुलेची मरणा पाहिले मी डोळा
दुर्धर आजाराने गेली पाच दशके खुर्चीला ते खिळून आहेत. जगभरात एक दंतकथाच बनून राहिलेल्या हॉकिंग यांच्या जीवनावर आधारित म हॉकिंग मयाच नावाच्या एका डॉक्युमेंटरीमध्ये खुद्द हॉकिंग यांनीच हा गौप्यस्फोट केला आहे.
मात्र त्यावेळी त्यांची पहिली पत्नी जेन हिने तसे करण्यास स्पष्ट नकार दिला होता. स्वित्झर्लंडमध्ये असताना छातीमध्ये झालेल्या जंतुसंसर्गामुळे ते हॉस्पिटलमध्ये दाखल असताना ही घटना घडली होती. मोटर न्यूरॉन डीसीजमुळे गेली पाच दशके चाकांच्याखुर्चीला खिळून राहिलेल्या हॉकिंग यांच्या जीवनावर ही डॉक्युमेंटरी आधारित आहे.