आंध्रा पाठोपाठ कॉंग्रेसमध्येही फूट

हैदराबाद – आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण हे नवे राज्य निर्माण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कॉंग्रेसमध्ये फूट पडली असून निर्णयाने नाराज झालेल्या काही कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचे आणि कॉंग्रेस सदस्यत्वाचे राजीनामे द्यायला सुरूवात केली आहे. राजीनामे देणार्‍या कॉंग्रेसजनांमध्ये तेलंगण आणि उर्वरित आंध्र प्रदेश या दोन्ही भागातल्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

गुंटूर येथील कॉंग्रेसचे खा. रायपती संबाशिव राव यांनी आपल्या खासदारकीचा आणि कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा अनुक्रमे लोेकसभेच्या सभापती मीराकुमार आणि कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठविला आहे. त्यांच्या पाठोपाठ पूर्व गोदावरी जिल्ह्यातील मुम्मीडीवरम् या विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. सतीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. याच जिल्ह्यातल्या रामचंद्रपुरम्चे आमदार थोटा त्रिमुर्तुलु यांनीही राजीनामा दिला आहे.

तेलुगु देसमचे अनंतपूरचे आमदार पी. अब्दुलगनी, २० कलमी कार्यक्रम समितीचे अध्यक्ष तुलसीरेड्डी यांनीही राजीनामे दिले आहे. केंद्र सरकारने तेलंगण निर्मितीचे संकेत देताच हे राजीनामा सत्र सुरू झाले आहे. तेलंगण निर्मितीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेस आणि वाय.एस.आर. कॉंग्रेस या पक्षांनी आज उर्वरित आंध्रात बंदचे आवाहन केले आहे. दरम्यान तेलंगण निर्मितीमुळे तेलंगण भागात आनंदाचे वातावरण पसरले आहे. काल हा निर्णय कळताच तेलंगणातल्या जनतेने पेढे वाटून, ङ्गटाके ङ्गोडून आणि मिरवणुका काढून या निर्णयाविषयीचा आनंद व्यक्त केला.

Leave a Comment