अँजेलिना हॉलीवूडची सर्वांत महागडी तारका

अवघ्या ३ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा हॉलीवूड तारका अँजेलिना जोली हॉलीवूडची सर्वात महागडी अभिनेत्री ठरली असून, तिने ‘फोर्ब्स’च्या महागड्या १00 अभिनेत्रींच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले आहे.३८ वर्षीय अँजेलिनाने नुकतीच एक दुर्मिळ शस्त्रक्रिया करून आपले स्तन काढून टाकले होते. तेव्हा तिच्या धाडसाचे मोठे कौतुक करण्यात आले होते.

अँजेलिनाने जून २0१२ ते जून २0१३ या कालावधीत तब्बल ३३ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. हे उत्पन्न संपूर्ण करांसह एकत्रित आहे, असे ‘फोर्ब्स’ने म्हटले आहे. अँजेलिनानंतर या क्रमवारीत यंदाची ऑस्कर विजेती अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स आणि क्रिस्टन स्टेवार्ट या अभिनेत्रींचा समावेश असून, त्यांचे उत्पन्न अनुक्रमे २६ दशलक्ष व २२ दशलक्ष डॉलर्स एवढी आहे. ‘फ्रेंड्स’ची नायिका जेनिफर अँनिस्टन या क्रमवारीत २0 दशलक्ष डॉलर्सची कमाई करत चौथ्या क्रमांकावर आहे. तर १६ दशलक्ष कमावणारी एम्मा स्टोन ही यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. १00 अभिनेत्रींच्या या क्रमवारीत एम्माने प्रथमच स्थान पटकावले आहे.

Leave a Comment