श्रद्धा शिकली स्कुबा डायव्हिंग

‘आशिकी-२’ या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे अचानक प्रकाशझोतात आलेली शक्ती कपूरची कन्या श्रद्धा कपूरला अभिनयासोबत आणखीही बरेच काही करणे आवडते. मनाला वेगळाच आनंद देणार्‍या आपल्या छंदांना पूर्ण वेळ देता येईल, असा तिचा नेहमीच प्रय▪असतो. अलीकडेच तिने आपला एक छंद पूर्ण केला आहे. तोही साधासोपा नाही तर स्कुबा डायव्हिंग शिकण्याचा. अनेकांना कठीण जाणारे स्कुबा डायव्हिंग शिकून घेतल्यानंतर आता तिला त्याचे व्यावसायिक लायसन्सही मिळाले आहे.

श्रद्धाला सुरुवातीपासून स्कुबा डायव्हिंगचे मोठे आकर्षण होते. ‘जिंगदी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर या खेळातील तिचा रस आणखी वाढत गेला. तेव्हापासून आपणही स्कुबा डायव्हर होण्याचे रीतसर प्रशिक्षण घ्यायचे, असा निर्धार तिने केला. विशेष म्हणजे ‘जिंगदी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटासाठी अभिनेत्री कतरिना कैफला ज्या प्रशिक्षकाने धडे दिले होते, त्यानेच श्रद्धाला हा खेळ शिकविला. ‘आशिकी-२’ या चित्रपटाचे चित्रणही सुरू झाले नव्हते, तेव्हापासूनच श्रद्धाने या कोर्ससाठी नाव नोंदविले होते. त्यानंतर काही महिन्यांनी तिने त्याचे प्रशिक्षण घेतले. अर्थात मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर तिचे हे प्रशिक्षण झाले. सुरुवातीस तिलाही ते थोडे जड गेले, पण आता आपल्या या कामगिरीवर ती बेहद खूश आहे.

Leave a Comment