
उत्कृष्ट अभिनयामुळे बॉलीवुड चित्रपट सृष्टीत आपली वेगळी छाप पडणाऱ्या प्रियांका चोप्राने आंतरराष्ट्रीय अल्बममध्ये गाण’ गाऊन प्रेक्षकांना चकीत करून टाकलंय. एक गायिका म्हणूनही प्रेक्षकांनी तिला सहज स्वीकारल आहे. प्रियांकाच्या पावलावर पाऊल ठेवत तिची चुलत बहिण परिनीतीनेही पार्श्वगायिका बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी तिने प्रियंकाला आपले प्रेरणास्थान मानले आहे. “इशकजादे” चित्रपटातून बॉलीवुड चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारी परिनीती हळू-हळू स्थिरावू लागली आहे.
