दिवाळीपूर्वी रिक्षाकल्याण मंडळ स्थापले जाण्याची शक्यता

पुणे, दि.30 (प्रतिनिधी) -राज्यातील रिक्षा चालकांच्या विविध माग्ण्यांसाठी रिक्षा चालक मालक कृती समितीच्या वतीने 18 जुलै रोजी जागर आंदोलन करण्यात आले होते, तसेच 30 जुलै रोजी परिवहन आयुक्तालयावर निदिीर्शने करण्याचा इशारा दिला होता, त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परिवहन सचिव, आयुक्त यांची 29 जुलै रोजी रात्री उशिरा बैठक घेऊन दिवाळीपूर्वी रिक्षा कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले.

या चर्चेच्या वेळी कृती समितीचे सरचिटणिस नितिन पवार, आमदार मोहन जोशी, मुख्यंमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव अजयकुमार जैन यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत 16 वर्षानंतर परवाना उतरविण्याचा निर्णय मुंबई शहरापुरता मर्यादित असल्याचे सांगण्यात आले. 10 विद्यार्थ्यांना रिक्षातून नेण्याचे प्रात्यक्षिक परिवहन आयुक्त पुण्यात पहातील, 90 हजार मृत परवान्याचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला. छोट्या शहरात इ मिटर सक्ती रद्द करण्यासाठठी कायदेशीर सल्ला मागवण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. पुयातील सीएनजीच्या तुटवड्या बाबत लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी ऑइल कंपन्यांची बैठक बोलावण्याचा निर्णय तसेच रिक्षा परवाना हस्तांतरण बाबीवर विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
—————————

Leave a Comment