चलो चाईना’ त लारा दत्ताचे पुनरागमन

माजी मिस युनिवर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता पुन्हा एकदा लवकरच सिल्वरस्क्रीनवर दिसणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लारा दत्ता तिच्या आगामी चित्रपटात अभिनेता विनय पाठक याच्या सोबत दिसणार आहे. प्रसुती काळ चालू असल्याने बऱ्याच दिवसांच्या सुट्टीवर असलेल्या लाराचा हा प्रसुतीनंतरचा पहिलाच चित्रपट असणार आहे.

लारा शेवटचे डेविड या चित्रपटात एका छोट्या भूमिकेत दिसली होती. परंतु यानंतर लारा पूर्णपणे आपल्या कमबॅक ‘चलो चाईना’ या चित्रपटातून करणार आहे. ‘चलो चाईना’ हा 2011 मधील ‘चलो दिल्ली’ या चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे. दिग्दर्शक शुशांत शाह यांच्या ‘चलो दिल्ली’ या चित्रपटात लारा विनय पाठक याच्या सोबत दिसली होती. तर सुत्रांनुसार ‘चलो चायना’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष करणार आहेत.

Leave a Comment