कोहलीने कर्णधारासारखे वागावे-अझरूद्दीन

नवी दिल्ली- पंचांने दिलेला निर्णय हा अंतिम असतो त्यामुळे त्याच्या वर नाराजी व्यक्त न करता विराट कोहलीने टीम इंडियाच्या कर्णधारासारखे वागावे असे मत टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

दोनच दिवसांपूर्वी झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने बाद झाल्याच्या दिलेल्या निर्णयावरून पंचांवर नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळी काही काळ विराट मैदानावरच थांबून होता. त्यामुळे त्यासाठी तिस-या अंपायरची मदत घ्यावी लागली होती. हा सामना टीम इंडियाने जिंकला होता. परंतु, विराट कोहलीच्या या वागणूकीवर मोहम्मद अझरुद्दीन नाराज झाला आहे.

यावेळी बोलताना मोहम्मद अझरुद्दीन म्हणाला, ‘टीम इंडियाचे भविष्य म्हणून सर्वजण कोहलीकडे पाहत आहेत. कित्येक क्रिकेटरसिक भविष्यातील टीम इंडियाचा कर्णधार म्हणून त्याच्या कडे पाहत आहेत. त्यामुळे कोहलीने स्टेडियमवर कर्णधारासारखी वागणूक ठेवली पाहीजे. कोहली उत्तम खेळाडू आहे. प्रत्येकवेळी मात्र स्वभावात आक्रमकपणा ठेवून चालत नाही. त्यासाठी आगामी काळात कोहलीने त्यामध्ये बदल घडवून आणण्याची गरज आहे.’

Leave a Comment