…और मैं पीता गया

न्यूयॉर्क – हिंदी चित्रपटांमध्ये प्रेम, प्रेमभंग आणि प्रेमभंगाच्या दु:खाने व्याकूळ झालेल्या नायकाचे दु:ख मद्याच्या प्याल्यात बुडवणे या गोष्टी अगदी सामान्य असतात. परंतु माणूस खरोखरच दारू का पीतो यावर संंशोधन करण्याची गरज आहे असे वाटल्यावरून अमेरिकेतल्या काही संशोधकांना वाटले. त्यांच्या संशोधनात मात्र माणूस दु:खासाठी दारू पीत नसून रागाच्या भरात दारू पीतो असे दिसून आले आहे. पुरुष दु:ख किंवा आनंदामुळे दारू पीत नसतात असेही या संशोधकांचे मत आहे.

दारू पिण्याची पुरुषांची कारणे आणि महिलांची कारणे यांचा तौलनिक अभ्यास या संशोधकांनी केला आहे. बाई असो की पुरुष असो त्यांना आपली दु:खे दारूच्या प्याल्यात बुडल्यासारखी वाटतात. पण प्रत्यक्षात त्यांना त्यात यश येत नाही असे या संशोधकांना आढळले आहे. युनिव्हर्सिटी ऑङ्ग व्हर्मोंट या विद्यापीठात या संबंधात संशोधन करण्यात आले आहे.

या संशोधकांनी मद्यप्राशनाच्या दुसर्‍या दिवशीचे परिणाम सुद्धा तपासून पाहिले. दारू पिण्यामागची महिलांची कारणे वेगळी असतात आणि त्यांच्यावर होणारे परिणाम सुद्धा वेगळे असतात, असे त्यांच्या निदर्शनास आले आहे. दारू पिण्यामागे तणाव हे एक मोठे कारण असते असा निष्कर्षही त्यांनी काढला आहे. त्यांनी या निरीक्षणासाठी २१ वर्षांपासून ८२ वर्षापर्यंतच्या महिला आणि पुरुषांचे निरीक्षण केले आहे.

Leave a Comment