ईपीएफ खातेधारकांना ऑनलाईन ट्रान्स्फर सुविधा

नवी दिल्ली दि.३० – येत्या १५ ऑगस्टमधून ईपीएफ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या खातेधारकांना ऑनलाईन ट्रान्स्फर सुविधा दिली जाणार असून त्याचा लाभ पाच कोटींहून अधिक खातेदारांना होणार आहे.

या संदर्भात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दरवर्षी कार्यालयाकडे नोकरी बदल, स्थलांतर या व अशा कारणांनी १३ लाखांहून अधिक अकौंट ट्रान्स्फर साठीचे अर्ज येत असतात. इतक्या मोठ्या संख्येने येणार्‍या अर्जांचा निपटारा करण्यात बराच वेळ जातो व खातेदारालाही बरेच वेळा कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात व त्यात त्यांचेही श्रम आणि पैसे तसेच वेळ वाया जातो. त्यामुळे ऑनलाईन सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कार्यालयाने आपल्या खातेदारांच्या डिजिटल स्वाक्षर्‍या घेण्याची मोहिम हाती घेतली असून पुढील दोन आठवड्यात हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर १५ ऑगस्टपासून ही सेवा सुरू होऊ शकते. यामुळे खातेदाराला प्रत्यक्ष कार्यालयात येण्याची गरज पडणार नाही. अकौंट ट्रान्स्फर साठी येत असलेल्या अर्जात ८० टक्के प्रमाण आय टी मधील कर्मचार्यांूचे असते असेही समजते. गेल्या वर्षी १ कोटी ७ लाख खातेदारांनी अकौंट ट्रान्स्फर साठी अर्ज केले होते. यावर्षी १ कोटी २० लाख अर्ज येतील असा अंदाज केला जात आहे.

Leave a Comment