बॉलीवुड अभिनेता जॉन अब्राहमसोबतच्या ब्रेकअपनंतर अभिनेत्री बिपाशा थोडी नर्वस झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून बिपाशा एकटी राहिली नाही आता तिला एक नवीन प्रेमी मिळाला आहे. बिपाशाच्या जीवनात आता नवीन प्रेमी म्हणून अभिनेता हरमन बवेजाने इंट्री केली आहे. त्यारमुळे आता बिपाशा बसु आणि हरमन बावेजा यांच्या प्रेम कहानीचा नवीन चप्टर गोवामध्ये सुरू झाला आहे.
बिपाशा आता हरमनसोबत बिजी
जॉनपासून काही दिवसापूर्वी दूरावलेली बिप्स आता जीवनात प्रेम प्रसंग म्हटले की त्याच्याकडे गंभीरपणे पाहते. यापूर्वी तिचे नाव काही दिवसापूर्वीच अभिनेता राणा दुग्गुबती सोबत जोडले गेले होते. त्यानंतर काहीकाळ तिने अभिनेता शाहिद कपूर सोबत दोस्ती केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून हरमन सोबत ती ज्या मूडमध्ये दिसत आहे. ते पहिल्यानंतर ती प्रेमाप्रती खूप गंभीर असल्याचे दिसत आहे.
यापूर्वी हरमनचे नाव अभिनेत्री प्रियंका चोप्रा सोबत जोडण्यात आले होते. दोघांनी एका सिनेमात एकत्रित काम केले होते. त्यांचा हा सिनेमा फ्लॉप ठरल्याने दोघांचे ब्रेकअप झाले होते; गेल्या काही दिवसांपासून मात्र हरमन सारखा बिप्सच्या टचमध्ये आहे. शुटच्या निमित्ताने बिप्स विदेशात असली तरी हरमनच्या संपर्कात असते. नुकतेच गोवामध्ये बिप्स आणि हरमन जोडीने तीन दिवस एकत्र घालवले.