नासा आणि इस्रो तयार करणार उपग्रह

वॉशिंग्टन- आज उपग्रहाद्वारे अनेक गोष्टी चालत आहेत. आपण एका ठिकाणी बसून अनेक गोष्टी पाहू शकतो , त्याच पद्धतीने त्याचे फोटोही काढून घेऊ शकतो. त्यातच भर म्हणून आता अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा व भारताची अंतराळ संशोधन संस्था पहिल्यांदाच संयुक्तपणे उपग्रह तयार करण्यासाठी एकमेकांशी चर्चा करत आहेत. या उपग्रहाच्या व्यवहार्यतेची तपासणी करणे सध्या सुरू आहे.

सार(सिंथेटिक अ‍ॅपेर्चर रडार) प्रणाली असलेल्या या उपग्रहाच्या निर्मितीबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी दिली आहे. नासाचे अधिकारी चार्ल्स बोल्डन यांनी 25 जून रोजी इस्रेच्या अहमदाबाद येथील केंद्राला भेट दिली. त्या वेळी त्यांनी राधाकृष्णन यांच्याशी या संदर्भात चर्चा केली.

या वेळी इतर वरिष्ठ अधिकारीदेखील उपस्थित होते. ही एक अतिशय महत्त्वाची सुरुवात असून हा प्रकल्प यशस्वी झाला तर भविष्यात असे अनेक प्रकल्प हाती घेतले जातील, असे के. राधाकृष्णन यांनी सांगितले.

 

Leave a Comment