ऑस्कर ज्युरीसाठी मराठमोळे विजय पाटकर यांची निवड

भारतातून ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवण्यात येणार्‍या चित्रपटांच्या निवड समितीत मराठी अभिनेते विजय पाटकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. ऑस्करसारख्या मानाच्या सोहळ्याच्या समितीत आपली निवड झाली हा माझा बहुमान समजतो, त्यामुळे यात खारीचा वाटा असेल.

देशभरातील उत्तमोत्तम चित्रपट पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळणार असल्याचे पाटकर यांनी निवड
झाल्यानंतर सांगितले.नवी दिल्लीतील फिल्म फेडरेशनच्या वतीने ऑस्करच्या समितीत दहा जणांची निवड होते. त्यात अभिनेता विजय पाटकर यांची निवड झाल्याने मराठी चित्रपटसृष्टीतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 17 ते 22 सप्टेंबर या काळात मराठी, हिंदी, बंगाली, तामीळ, तेलगू अशा
भारतीय भाषांमधील उत्तम चित्रपट येथे दाखवण्यात येणार असल्याचे संयोजकांनी कळवले आहे.

Leave a Comment