वॉशिंग्टन दि.३० – अॅपलचा नवा फ्लॅगशीप प्रॉडक्ट म्हणून जाहिरात करण्यात आलेला आयफोन पाच एस सप्टेंबरच्या सहा तारखेलाच लाँच केला जाणार असल्याचे वृत्त आहे. हे वृत्त खरे असेल तर हा फोन अपेक्षेपेक्षा बराच आधी बाजारपेठेत येणार आहे..

आयफोन पाच एस बाजारात उशीरा दाखल होणार असल्याच्या बातम्या यापूर्वीच प्रसिद्ध झाल्या आहेत. कंपीने सध्याच्या चार इंची डिस्प्लेऐवजी आणखी मोठा स्क्रीन या फोनसाठी देण्याचा निर्णय घेतल्याचे कारण या उशीरामागे सांगितले जात होते. अॅपलने या संदर्भात अजून कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. मात्र जर्मन ब्लॉग वर देण्यात आलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या साईजचा स्क्रीन असलेले दोन नवे फोन अॅपल बाजारात आणणार आहे.