शिर्डीमध्ये पुन्हा सिरीयल किलिंग

शिर्डी: शिर्डीमध्ये सोमवारी पुन्हा तीन भिका-याचे मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सिरीयल किलिंगचे प्रकरण उघडकीस आले आहे. शिर्डीत गेल्या महिन्याभरापूर्वी दोन भिका-यांची हत्या झाली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा सिरीयल किलिंगमुळे शिर्डीमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

रविवारी रात्री या तिन्ही भिका-यांचा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. डोक्यात अवजड वस्तूने प्रहार करुन हत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर याबाबतची अधिक माहिती समोर येईल. या खूनप्रकरणाबाबत काही धागेदोरे मिळतात का याचा तपास त्या पध्दतीने सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे पण सिरीयल किलींगचे प्रकार घडले होते. त्यामु‍ळे शिर्डी पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून तिथे झालेल्या सिरीयल किलिंग प्रकरणाच्या तपासाची माहिती मागवली आहे. त्यामुळे याबाबत तपासला गती येणार आहे. सध्या विविध अंगाने पोलिस या खूनाचा उलघडा करण्याचा प्रयत्नात आहेत.

Leave a Comment