आप पक्षात फूट – बापची स्थापना लवकरच

नवी दिल्ली दि.२९ – हेडिंग वाचून गोंधळात पडला असाल ना? अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पार्टीसंबंधीची ही बातमी आहे. हा पक्ष स्थापन होऊन अजून पुरते वर्षही लोटलेले नाही तोपर्यंतच या पक्षात फूट पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पक्षातून फूटून बाहेर पडलेल्यांनी आम आदमी पक्षाच्या (एएपी – आप) विरोधात भारतीय आम आदमी परिवार ( बीएएपी – बाप) पक्ष स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. अशोक अरोडा यांच्या नेतृत्त्वाखाली आम आदमीतील असंतुष्ट बंडखोर या पक्षासाठी एकत्र आले आहेत.

आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मनीष सिसोदिया म्हणाले की आम्हीही असा पक्ष स्थापन केला जात असल्याबद्दल ऐकतो आहोत. पक्षात कांही कायर्कर्त्यांनी निवडणुकीसाठी तिकीट न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मात्र आमच्या पक्षाने निवडलेले उमेदवार हे कोणा एकाच्या मर्जीनुसार निवडले जात नाहीत तर पक्षाची स्क्रिनिग कमिटी उमेदवार ठरविते. ही बाब असंतुष्टांनी समजून घ्यायला हवी.

पक्षात कांही असंतुष्ट असतील तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पक्षाचे वरीष्ठ नेते योगेंद्र यादव बंडखोरांशी बोलणी करत आहेत असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment