राज्यसभेची खासदारकी 100 कोटीत

नवी दिल्ली – राजकारणात काय चालते, याचे दाखले निवडून आलेले लोकप्रतिनिधी देत आहे. खासदारकीच्या निवडणुकीत आपल्याला आठ कोटी रुपये खर्च करावे लागल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. त्यावरून बरेच वादळ उठले. आता तर केंद्रात सत्तेत असणार्‍या काँग्रेसच्याच नेत्यांने खासदारकी 100 कोटी रूपयात मिळते, अशी धक्कादायक कबुली दिली.

बिरेंद्र सिंह यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपने त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणत्याही निवडणुकीच्या तिकीटासाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे अनेकवेळा ऐकले असेलच. मात्र आता खुद्द काँग्रेसच्या खासदारानेच त्याबाबतची कबुली दिली आहे. राज्यसभेच्या जागेसाठी 100 कोटी रुपये मोजावे लागत असल्याचे बिरेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

असे म्हणून सिंह यांनी काँग्रेसला हा घरचा आहेर दिल्याने काँग्रेसच्या डोकेदुखीत अधिकच भर पडली आहे. बिरेंद्र सिंग यांनी100 कोटी रुपये देऊन काँग्रेसची राज्यसभेची खासदारकीही मिळवता येते, असं जाहीर वक्तव्य करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये पदे विकली जात असल्याचे यातून आता पुढे येत आहे.

काँग्रेसविरोधात बिरेंद्र सिंग यांनी उघड बंड पुकारल्याचे दिसत आहे.आपल्याला रेल्वे मंत्रालय मिळणार, हे जवळपास निश्चित झाले होतं. पण ऐनवेळी आपला पत्ता कापण्यात आला, असा हल्लाबोल युपीए सरकावर केलाय. काँग्रेसला 100 कोटी दिल्यावर राज्यसभेची खासदारकी मिळते. मात्र, राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी आपले बजेट 100 कोटींचे होते. परंतु 80 कोटी रूपयांत काम झाले. त्यामुळे 20 कोटी वाचले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

बिरेंद्र सिंग यांच्या आरोपामुळे विरोधकांना नविन मुद्दा हाती सापडला आहे. याबाबत भाजपने टीका केलेय. काँग्रेस हे भ्रष्टाचाराचं मूळ आहे. त्यातच पक्ष बुडाला, हेच चौधरी यांच्या विधानावरून स्पष्ट होते, अशी टीका भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.

दरम्यान, अडचणीत सापडलेल्या काँग्रेसने तात्काळ सारवासारव केली आहे. एखाद्याची कामगिरीवरून राज्यसभेवर उमेदवाराची निवड होते. काहीजण लाखभर रूपये देऊ शकत नाहीत, ते 100 कोटी रूपये देणार, असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आलाय. बिरेंद्र सिंग यांचा दावा खोडून काढण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आला आहे.राज्यसभेच्या एका जागेसाठी 100 कोटी रुपये लागतात, असं एकाने सांगितल्याचे बिरेंद्र सिंह यांनी एका कार्यक्रमात म्हटले आहे. पण मी राज्यसभेची जागा 80 कोटीत मिळवली असून 20 कोटी रुपये वाचवल्याची कबुलीही बिरेंद्र सिंह यांनी दिली आहे. इतकंच नाही, तर जे कोणी या जागेसाठी 100 कोटी रुपये गुंतवू इच्छित आहे, त्यांनी या गरीब देशाचा विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

भाजपने याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. बिरेंद्र सिंह यांनी स्वत:चेच उदाहरण दिल्याचं भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. काँग्रेसला अशा प्रकारचे ’डील’ करण्याची सवय आहे. काँग्रेसने देशातील राजकारणाला तळागाळात पोहोचवलं आहे असे जावडेकर म्हणाले.