
मुंबई- विश्वसुंदरी आणि अभिनेत्री युक्ता मुखीचा पती प्रिन्स टुलीला भारताबाहेर जाण्यास मनाई करताना, त्याला पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वांद्रे कार्यालयात 31 जुलैपर्यंत रोज हजेरी लावणे बंधनकारक आहे, असे निर्देश सत्र न्यायालयाने शुक्रवारी दिले. युक्ता या वेळी न्यायालयात आली नव्हती. टुलीच्या अटकपूर्व जामीनावर 20 ऑगस्ट रोजी न्यायालय निर्णय देणार आहे. पती प्रिन्स हा शारीरिक छळ करत असून, तो अनैसर्गिक संबंध ठेवण्यास सांगतो, असे युक्ताचे आरोप असून तिने आंबोली पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिस अटक करण्याची शक्यता वाटल्यामुळे प्रिन्सने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. त्याचा निर्णय शुक्रवारी होणे अपेक्षित होते.