नव्या पिढीची घडी बिघडली आहे. तिची काही वेगळीच थेरं सुरू आहेत अशी तक्रार केली की, तिच्याकडे कोणी ङ्गारशा गांभीर्याने पहात नाही कारण कित्येक पिढ्यांपासून हा प्रकार सुरू आहे. मावळती पिढी उगवत्या पिढीच्या नावाने बोटे मोडतच आली आहे. इसवी सनाच्या काही शतकांतल्या एखाद्या वर्षातल्या जुन्या पिढीकडे त्या वेळच्या नव्या पिढीबाबत काय मत होते याचा शोध घेतला तर हीच तक्रार ऐकायला येते. जिच्या विषयी अशी तक्रार असते अशी पिढी मात्र बिनधास्त असते. पण हीच पिढी कधीना कधी जुनी होते तेव्हा तीही त्यांच्या काळातल्या उगवत्या पिढीबाबत अशीच तक्रार करीत रहाते. पण आता मात्र आजची नवी पिढी खरीच बिघडली आहे. कारण तिने नीतीमत्तेच्या सार्याच मर्यादा सोडल्या आहेत. तिचे अध:पतन झाले आहे. आपल्या भोवताली जे काही चालले आहे ते पाहिले तर ही गोष्ट खरी वाटते. साधारण पन्नास वर्षांपूर्वी एकतर्फी प्रेमातून कोणी कोणाचा खून केल्याची बातमी वाचायला मिळाली होती का ? आणि आता अशा बातमीशिवाय एखादा आठवडा तरी जातो का? काल महाराष्ट्रात एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर अशीच आपत्ती कोसळली. हा प्रकार उल्हासनगर येथे घडला.
नव्या पिढीची बिघडलेली घडी
महाराष्ट्रात छेडाछेडी आणि एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले यांचे प्रमाण फारच वाढले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या औरंगाबादेतल्या युवती मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री आर. आर, पाटील यांना व्यासपीठावर पाचारण करून त्यांना बोलते केले होतेे. या मेळाव्यातल्या तरुणींच्या वक्तव्यांतून त्या अशा प्रकारांनी किती त्रस्त आहेत हे तीव्रतेने समोर आले होते. राज्यातल्या हजारभर तरुणींनी या त्रासाला कंटाळून आपली जीवने संपवली आहेत. त्यापेक्षा अधिक मुलींनी आपली शिक्षणं संपवून घरी बसणे पसंत केले आहे. ही संख्या पाहिली म्हणजे राज्यातील किती लाख मुली हा त्रास सहन करून शिकत असतील याचा अंदाज येतो. अर्थात सरकारच्या लक्षात या प्रश्नाची तीव्रता आलेली नाही असे दिसते कारण तेव्हापासून हा त्रास संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचे एकही पाऊल पडलेले नाही. समाजातल्या कोणत्या प्रश्नांची सोडवणूक प्राधान्याने केली पाहिजे याचा निर्णय सरकारला करता येत नाही याचा हा पुरावा आहे. छेडछाड हा एक प्रकार आहे आणि अंगावर ऍसिड फेकणे, एकतर्फी प्रेमातून खून करण्याचा प्रयत्न करणे हे त्याचे पुढचे प्रकार आहेत.
उल्हासनगर येथील या प्रकारातन एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून एका मुलीच्या अंगावर उकळते तेल ङ्गेकले. ती आपल्याला लग्नास होकार देईल की नाही या शंकेने व्याकूळ झालेल्या या प्रेमवीराने नकार ऐकण्याच्याऐवजी आपल्या प्रेयसीला संपवण्याचा असा प्रयत्न केला. सुदैवाने ती वाचली आहे. अशा प्रकारच्या घटना घडल्या की देशात सर्वत्र होत असलेल्या ऍसिड हल्ल्यांची आठवण होते. बर्याच ठिकाणी एकतर्ङ्गी प्रेमातून ऍसिड हल्ला किंवा खून किंवा खुनाचे प्रकार होतात, हे बदलत्या सामाजिक परिस्थितीचे द्योतक आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाने अशा घातक प्रेमवीरांना ऍसिड सहजा सहजी उपलब्ध होऊ नये याबाबत सरकारने उचलावीत, असा आदेश दिला आहे. उल्हासनगरच्या या प्रेमवीराचा ऍसिड ङ्गेकण्याचाच इरादा असावा; परंतु ऍसिडच्या बाबतीत जे निर्बंध घातले गेले आहेत त्याचा विचार करून त्याने ऍसिडऐवजी तेलाचा वापर केला असावा, असे दिसते. एकतर्फी प्रेमातून असे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. असे प्रकार घडले की उल्हासनगरच्याच रिंकू पाटील प्रकरणाची आठवण होते. या प्रकरणात एकतर्फी प्रेमातून दहावीच्या परीक्षेला गेलेल्या रिंकूची चाकूचे वार करून हत्या करण्यात आली होती. नंतर असाच एक प्रकार जळगावला घडला होता. कराडमध्ये एका मुलीचा तर भर रस्त्यात अनेक लोकांच्या समोर भोसकून खून करण्यात आला होता.
काही प्रकारांमध्ये एकतर्फी प्रेमातून मुलींना जाळून मारण्याचेही प्रयत्न झाले आहेत. मात्र यातल्या बर्याच बातम्या प्रसिद्धीपासून दूर राहिल्या. रिंकू पाटीलचा प्रकार १९९० साली झाला. त्यावर बरेच दिवस चर्चा होत गेली. नंतर मात्र असे प्रकार वारंवार घडायला लागले की त्याची चर्चा थांबते. पण असे अनेक प्रकार महाराष्ट्रात घडत आहेत. चित्रपट आणि टीव्ही यातील मालिकांवर नजर टाकली तर अशा प्रकारात त्यांचा मोठा वाटा असतो, असे म्हणण्याचा मोह होतो. सध्या टीव्हीवरच्या अनेक मालिकांमध्ये एखाददुसरा अपवाद सोडला तर बहुतेक मालिका प्रेम आणि विवाह, तसेच अनैतिक संबंध यांच्या भोवती गुंतलेल्या दिसतात. त्यांचा काही ना काही परिणाम मुलांच्या मनावर होत असतो. त्यातून अशा प्रकारांना चालना मिळते. पण हा काही निश्चित स्वरूपाचा निष्कर्ष नाही. आजच्या बदलत्या वातावरणामध्ये मुलामुलींच्या कामभावना वाढवण्याची मोठी क्षमता आहे. त्याला आपण आवर घालू शकत नाही. टीव्हीवर बंदी आणता येत नाही. पाकिस्तानमध्ये धार्मिक नेते तसा आग्रह धरीत असतात. त्यांनी सरकारला काही निर्बंधही लादायला लावले आहेत पण तर त्याचे परिणाम उलटे होतात. प्रश्न मोठा गंभीर आहे.