अहमदनगरच्या बुकेची गिनीज बुकमध्ये नोंद!

अहमदनगर – लग्न आणि भेटवस्तू हे एक अतूट नाते आहे. कारण लग्नसमारंभाला जाताना प्रत्येकाच्या हातात भेटवूस्तू असतातच. आजपर्यत लग्न समारंभात अनेक भेटवस्तू दिल्या जातात. मात्र, अहमदनगरमध्ये एका भावाने आपल्या भावाला दिलेली लग्नाची भेट अमूल्यच आहे. दीपक हरके याने आपल्या भावाच्या लग्नात तब्बल 211 फूट लांबीचा बुके भेट केलाय.

विशेष म्हनजे या बुकेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही नोंद झाली आहे. या बुकेबरोबर मुलगी बचाव’चा संदेशदेखील देण्यात आला आहे. आजपर्यंत जगातील सर्वात मोठा बुके म्हणजे 198 फुटांचा बुके कँनडामध्ये तयार करण्यात आला होता. 2003 साली या बुकेची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली होती.

दीपक हारके या तरुणाच्या भावाचं लग्न होतं. या लग्नात त्याने आपल्या भावाला एक अनोखी भेट दिली. जगातील सर्वात मोठा म्हणजे तब्बल 211 फूट लांबीचा बुके दीपक आपला भाऊ अनिकेत याला लग्नात भेट दिला. बेटी बचाव’ अभियान सध्या सर्वत्र राबवले जात आहे. त्याच उद्देशाने हा विश्वविक्रम करण्यात आला आहे.

211 फुटांचा हा बुके अहमदनगरच्या नितीन भूतारे याने बनवलाय. या बुकेसाठी 2000 विविध फुलांचा वापर करण्यात आला. एव्हढंच नाही तर काही इम्पोर्टेड आणि जरबेराची फुलंदेखील या बुकेसाठी वापरण्यात आली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’कडून प्रशस्तिपत्र आणि सन्मान चिन्ह देण्यात आलं. दीपकने दिलेली अनोखी भेट अनिकेतच्या आयुष्यभर स्मरणात राहील. असे असले तरी या विक्रमी बुकेमुळे का होईना अहमदनगरचं नाव विक्रमांच्या यादीत कोरले गेले आहे.

Leave a Comment