गांधीनगर, दि. 28- नरेंद्र मोदी यांना सोशल नेटवर्किंग साइटवर प्रचंड प्रसिद्धी आहे. त्यांच्या नावाच्या पहिल्या दोन अक्षरांना एकत्र करून नमो याच नावाने मोदींना साइटवर संबोधले जाते. हे लक्षात घेऊन मोदी चाहत्यांनी स्मार्टफोनला देखील हेच नाव देण्याचे ठरवले आहे. या स्मार्ट नमो गटात चीनमध्ये व्यवसाय करणारे बडे गुजराती व्यापारी देखील सहभागी आहेत.
यासंदर्भात स्मार्ट नमोचे प्रवक्ता अमित देसाई यांनी सांगितले, की चीनमधील अनेक नेत्यांच्या नावांवर एमपीथ्री प्लेअर, स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. यातूनच आम्हाला नरेंद्र मोदी यांच्या नावावर स्मार्टफोन बाजारपेठेत आणण्याची प्रेरणा मिळाली. पुढील महिन्यात फोनच्या डिझाईनचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी यांना डिझाईन दाखवून त्यांची परवानगी घेतली जाईल. फोनची किंमत सुमारे हजार रुपये राहणार आहे. याचे माफक किमतीतील व्हर्जन केवळ एक हजार रुपयांना मिळणार आहे. मात्र, हा फोन कधीपर्यंत बाजारात येणार याबद्दल काहीही माहिती देण्यात आलेली नाही.
राजकारण करत असताना निवडणुकीच्या प्रचारासह विविध क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणारे नरेन्द्र मोदी आता एका नव्याच गोष्टीमुळे प्रकाशात आले आहेत. आता नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक स्मार्टफोन बाजारात येणार आहे. मोदींच्या चाहत्यांनी ङ्गस्मार्ट नमोफ नावाचा स्वतंत्र गट तयार केला असून त्यांच्या गटाकडून स्मार्ट ङ्गनमोफ अॅन्ड्रॉईड फोन बाजारात आणण्याची घोषणा करण्यात आली आहे