ब्रिटनचा शाही वारस होणार सातवा जॉर्ज

लंडन- ब्रिटनच्या राजघराण्यात जन्माला आलेल्या नव्या राजपुत्राचे नामकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नावामध्ये ही भारताचा संबंध आहे. जॉर्ज अलेक्झांडर लुई असे या राजपुत्राचे नाव ठेवण्यात आले असून तो राजसिंहासनाचा तिसरा दावेदार आहे. प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नी केट
मिडल्टन यांनी 300 वर्षाच्या शाही परंपरेला अनुसरून हे नामकरण केले आहे. या बाळाच्या नावातील लुई हे नाव शाही कुटुंबाची परंपरा दर्शवणारे असून ते भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड लुई माउंटबॅटन यांची आठवण जपणारे आहे.

विल्यम यांचे पिता प्रिन्स चार्लस्, माउंटबॅटन यांचे चाहते होते. त्यांना प्रेमाने अंकल डिकी’ म्हणून संबोधले जात असे. त्यांच्या या आवडीमुळेच लुई हे नाव स्वीकारण्यात आले. तर जॉर्ज हे नाव त्यांच्या शाही घराणचे वैशिष्टय दर्शवणारे आहे आणि अलेक्झांडर हे नाव त्यांच्या स्वत:च्या पसंतीचे आहे, असे शाही दांपत्याने सांगितले आहे. जॉर्ज हे नाव शाही घराण्यातील सर्वात पसंतीचे नाव असून गेल्या 300 वर्षापासून शाही घराण्यातील विविध राजांनी हे नाव लावले आहे. त्यामुळे नव राजपुत्राला हे नाव दिल्यावर तो राजा झाल्यास किंग जॉर्ज सातवा म्हणून ओळखला जाणार आहे.

Leave a Comment