दोन वर्षं ‘तो‘ जगला हृदयाशिवाय जिवंत!

लंडन- एका ब्रिटिश व्यक्तीने दोन वर्षं विना हृदयाचं जिवंत राहाण्याचा रेकॉर्ड केला आहे. ही व्यक्ती दोन वर्षं बाह्य रक्तपंपाच्या मदतीने जिवंत राहिली आहे. फार्मा कन्सल्टटंट असणारे मॅथ्यू ग्रीन गेले दोन वर्षं बिन हृदयाचे जिवंत आहे. 42 वर्षीय मॅथ्यू ग्रीन यांना गेल्या महिन्यात एक हृदय दान करण्यात आलं.
तोपर्यंत गेली दोन वर्षं बाह्य रक्त पंपाच्या मदतीने त्यांना जिवंत ठेवण्यात आलं होतं. एका जीवघेण्या आजारामुळे मॅथ्यू यांचं हृदय शरीरातून काढून टाकलं होतं. जुलै 2011 मध्ये कार्डियोमायोपॅथीच्या स्थितीत मॅथ्यूच्या हृदयाचे दोन्ही मुख्य चेंबर्स बंद झाले होते. तेव्हापासून मॅत्यू हृदयाविनाच जिवंत होता. अखेर त्याला दोन वर्षांनी नवं हृदय मिळालं आहे.

द संडे टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार केम्ब्रिजच्या वर्थ हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपण करण्यात आलंय. लवकरच मॅथ्यू पुन्हा पूर्ववत होऊन घरी परततील, अशी डॉक्टरांना आशा आहे. तिसर्‍यांदा जीवनदान मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो असं मॅथ्यू याने आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

Leave a Comment