टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी

हरारे- रविवारी हरारे येथे टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यातील थरार रंगणार आहे. सुरूवातीच्यार दोन सामन्यात विजय मिळवीत टीम इंडियाने निर्णायकी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आत होणारा तिसरा वनडे जिंकून मालिका जिंकन्याची संधी टीम इंडियाला चालून आली आहे. मालिकेतील आव्हान कायम राखायचे असेल तर यजमान झिम्बाब्वेला रविवारच्या सामन्यात विजय आवश्यक आहे.

टीम इंडियाने दमदार फलंदाजांच्या जोरावर दोन्ही लढतीत एकहाती विजय मिळवला. त्यासोबतच फिरकी गोलंदाजांनी प्रभावी मारा केली. फलंदाजांच्या बहारदार कामगिरीपुढे त्यांचे अपयश झाकले गेले. कर्णधार विराट कोहली पाठोपाठ सलामीवीर शिखर धवनने शतक ठोकण्याचा मान पटकावला. अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिकने सातत्य राखल्याने फलंदाजी चांगली झाली आहे. अन्य सलामीवीर रोहित शर्मा, सुरेश रैनाच्या फॉर्मची चिंता लागून राहिली आहे. लेगस्पिनर अमित मिश्रा आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा या फिरकी दुकलीने ब-यापैकी मारा केला तरी मध्यमगती मारा अस्थिर वाटतो. जयदेव उनाडकटने पाच विकेट घेत चांगले यश मिळवले.

झिम्बाब्वेने दोन्ही लढतींमध्ये दोनशहून अधिक धावा केल्या तरी फलंदाजी कामगिरी तितकी उल्लेखनीय नाही. त्यांच्यातर्फे सलामीवीर सिकंदर रझालाच शंभरहून अधिक धावा करता आल्यात. त्यानंतर इल्टन चिगुंबुरा, युवी सिबांडा आणि तळातील प्रॉस्पर उत्सेयाची नावे घेता येतील. भारताला रोखायचे असेल फलंदाजांची कामगिरी उंचावणे आवश्यक आहे. गोलंदाजीतही चिंतेची बाब आहे. सर्वाधिक तीन विकेट ऑफस्पिनर प्रॉस्पर उत्सेयाने घेतल्यात. गेल्या लढतीत खेळलेल्या डावखु-या ब्रायन विटोरीने मात्र प्रभावी गोलंदाजी केली आहे. मालिकेत परतण्याची शेवटची संधी असल्याने रविवारी यजमान गोलंदाजांचाही कस लागणार आहे. त्या मुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment