टीम इंडियाने जिंकली मालिका

हरारे- झिम्बाब्वेला तिसर्‍या वन-डेमध्ये पराभूत करत विराट कोहलीच्या युवा ब्रिगेडने पाच वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये बाजी मारली. या विजयासह भारताने सीरिजमध्ये 3-0 ने विजयी आघाडी घेतली. भारताने हरारे स्पोर्टस क्लब येथे रंगलेल्या झिम्बाब्वेविरूद्ध तिसर्‍या वन-डेत विजयाची नोंद करत सीरिजमध्ये 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या विजयासह यंगिस्तानने सीरिज विजयाची हॅटट्रिकही नोंदवली आहे.

सर्वप्रथम इंग्लंडमध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद मिळवल्यानंतर भारतीय टीमने कॅरेबियन बेटांवर रंगलेल्या ट्राय सीरिजमध्ये विजयाची नोंद केली. आता झिम्बाब्वेतही सीरिज विजय साजरा करत 2010मध्ये झिम्बाब्वेत झालेल्या पराभवाचीही टीम इंडियाने सव्याज परतफेड केली आहे. गोलंदाजांच्या भेदक मार्‍यामुळे भारताला झिम्बाब्वेवर मात करण्यात यश आले.

Leave a Comment