झिम्बाब्वेला सुरूवातीलाच दोन धक्के

हरारे – हरारे येथे खेळल्या जात असलेल्या तिस-या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेला सुरूवातीलाच दोन धक्के देवून दाणदाण उडवली आहे. सुरूवातीच्या धक्क्‍यानंतर झिम्बाब्वेचा संघ सावरला नाही. शेवटची बातमी हाती आली तेंव्हा त्यांनी १८ षटकात तीन गडी बाद ७३ धावा केल्या होत्या.

दरम्यातन, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. विनय कुमारने पहिल्या षटकात झिम्बाब्वेला पहिला धक्का दिला. झिम्बाब्वेचा सलामीवीर सिंबादाला विनयकुमारने झेल बाद केले. दुस-या षटकात मोहम्मद शमीने सिकंदर राजाला दिनेश कार्तिक करवी झेल बाद केले. यजमान संघाची सलामीची जोडी स्वस्तात बाद करुन टीम इंडियाने दबाव वाढविला आहे. तिसरा सामना जिंकून मालिका नावावर करण्याच्या इराद्यानेच टीम इंडियाने सुरुवात केली आहे.

टीम इंडियाने पहिला वनडे कोहलीच्या शानदार शतकाच्या बळावर जिंकला होता. दुस-या वनडेत सलामीवीर शिखर धवनने शतक ठोकले होते. हरारेत तिसरा सामना झाल्यानंतर उर्वरित दोन सामने बुलावायो येथे एक आणि तीन ऑगस्ट रोजी होणार आहेत. शेवटची बातमी हाती आली तेंव्हा त्यांनी १८ षटकात तीन गडी बाद ७३ धावा केल्या होत्या. मसकारा ३७ तर विलियमस तीन धावांवर खेळत होता.

Leave a Comment