आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणात दाऊद आरोपी

नवी दिल्ली: आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरनाचा तपास पूर्ण झाला आहे. दिल्ली पोलिसांनी या आरोपपत्रात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाचा समावेश करण्यारत आला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र तयार केले असून ते ३१ जुलैपुर्वी दाखल करण्यात येणार आहे. दोनशे पानांच्या या आरोपपत्रात एकूण ३८ जणांचा समावेश असून त्या मधील २९ आरोपीना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणातील दोन पाकिस्तानी आरोपींसह नऊ जण फरार असल्या चे समजते. या आरोपपत्रात छोटा शकील आणि दाऊदच्या गुन्ह्यांचीही माहिती दिली आहे.

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणीच्या तपासानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात सर्व ३८ आरोपीच्या भूमिकांच्या संदर्भात विवरण करण्यात आले आहे. तसेच दाऊद इब्राहिमचा आणि स्पॉट फिक्सिंग यांचा थेट संबंध कसा होता याचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या एस श्रीशांत, अजित चंदिला आणि अंकित चव्हाण या तीन खेळाडूंचांही समावेश आहे.

अजित चंडिलाकडून जप्त करण्यात आलेल्या महागड्या गिफ्ट्सचाही उल्लेख या आरोपपत्रात आहे. अजित चंडिला आणि फिक्सर सुनील भाटिया बेकायदेशीर पद्धतीने घेतलेल्या मोबाएल नंबरद्वारे खेळाडू आणि फिक्सरांशी बातचीत करत असत. शिवाय दाऊद हा भारतीय बुकींशी थेट संपर्कात असल्याचेही या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहुल द्रविड याच्या जबाबाचाही या आरोपपत्रात समावेश करण्यात आला असल्याचे समजते.

Leave a Comment