अमेरिकेत गोळीबार ; 8 ठार

मियामी (फ्लोरिडा) – अमेरिकेतल्या फ्लोरिडा मधील मियामी शहरात शनिवारी सकाळी झालेल्या गोळीबारात सात जण ठार झाले आहेत. यावेळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात हल्लेखोरही मारला गेला आहे. हल्लेखोर आणि पोलिस यांच्यातील हा गोळीबार तब्बल आठ तास सुरु होता.

या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मियामी शहरात असलेल्या एका इमारतीवर काही बंदूकधारी हल्लेखोरांनी हल्ला चढवला. या इमारतीत असलेल्या लोकांना हल्लेखोरांनी बंधकही बनवले. या गोळबारीचे वृत्त समजताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी याला प्रतिसाद न दिल्याने पोलिसांनीही गोळीबार सुरु केला.

तब्बल आठ तास पोलिस आणि हल्लेखोरांमधील धुमश्चक्री सुरु होती. सायंकाळी ८.30 वाजता सुरु झालेले गोळीबाराचे हे थरार नाट्य अखेर मध्यरात्री 2.30 वाजता संपले. यात ठार झालेल्यांमध्ये इमारतीच्या मालकाचाही समावेश आहे.

Leave a Comment