धमाल, निखळ मनोरंजन ‘श्रीमंत दामोदर पंत’

सध्या कादंबरीचे, नाटकाचे चित्रपटात रूपांतर करण्याचा करण्याचा ट्रेंड आला आहे. लोच्या झाला रे नाटकाचा खो खो केल्यानंतर आता दिग्दर्शक केदार शिंदे यांनी 10 ऑक्टोबर 1998 रोजी रंगमंचावर आलेले सुपरहिट नाटक ‘श्रीमंत दामोदर पंत’ चित्रपटाच्या र्स्वरूपात आपल्या भेटीला आणले आहे. सातारचे दामोदर पंत हे स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांना जनतेने श्रीमंत पंत पदवी बहाल केलेली आहे. देशाच्या हितासाठी त्यांनी इंग्रजां कडून, देशाची मालमत्ता देशाला मिळावी म्हणून मालमत्ता कोठे आहे याचा नकाशा काबीज करतात पण लखोबा आणि पन्तान्च्या मध्ये मध्ये हातापायी होवून नकाश्याचे दोन तुकडे होतात एक भाग लखोबाकडे तर एक श्रीमंता’कडे जातो ज्यावेळी ही घटना घडते त्यावेळी सायंकाळचे 6 वाजलेले असतात. या घटने नंतर पंत मुंबापुरीत येउन राहतात तिथे ते एक टोलेजंग वाडा बांधतात आणि तिथेच आपल आयुष्य घालवतात. काही वर्षानंतर त्या वाड्याची चाळ होते. त्या चालीचे रहस्य कोणालाच माहित नसते त्या चाळीत राहणर्‍या लोकांशिवाय.मुंबईच्या या चाळीत पंतान्चे हे कुटुंब सुख- समाधानाने नांदतंय पण फक्त 6 वाजेपर्यंतच !!

पंतान्चेपंथांचे निधन झाल्यानंतर पंतान्चा आत्मा त्यांचा नातू दामू (भरत जाधव ) च्या अंगात येत असे. पण त्याच वेळी ज्यावेळी लखोबा आणि पंथांची घटना घडली होती. नेमके 6 नंतर पालटतय वाड्याचे रूप !! होत तरी काय नक्की 6 नंतर ?? 6 नंतर चाळीचे एका भव्य दिव्य वाड्यात रुपांतर होते, हि सगळी अरेंजमेंट चाळीत राहणारे सर्व लोक आणि पंथांचे कुटुंब करत असतात. 6 नंतर जेव्हा पंथ दामूच्या अंगात येतात तेव्हा ते आपल्या वेश भूषेत येतात. ते आल्यानंतर वाड्यात जणू स्वातंत्र्य पूर्वी काळात आलो आहोत असा भास होतो . पंतांची जन्म भूमी – कर्म भूमी असलेल्या सातार्‍यात त्यांच्या नातीच सुमनच लग्न जमत . लग्न करायला सातार्‍यातसंपूर्ण चाळ जाते कारण वाड्यातले रहस्य कोणालाच माहिती नसते. तिकडे गेल्यावर कळते कि लाखोबाच्या नातवाचा हा सगळा कट असतो . कारण त्याला त्याचा आजोबांचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करायचे असते. तिथे गेल्यावर दामू मध्ये पंथांचे अवेळी आगमन आणि त्यातून झालेले घोळ व विनोद यांची गफलत खरच पाहण्यासारखी आहे .

लोकांच्या मनावर राज्य केलेल्या नाटकाचे चित्रपटात रूपातर करणे तसे आव्हान असते. हे आव्हान केदार शिंदेने लीलया पेलले आहे यात शंकाच नाही. नाटक पाहिलेल्या लोकांना चित्रपट पूर्णपणे नवीन वाटेल अशी पटकथा लिहिण्यात आली आहे. अनेक पात्रांचा यात अंतर्भाव करण्यात आल्याने चित्रपट नाटकापेक्षा पुर्णपणे वेगळा बनला आहे. वैशाली सामंत, अभिराम भडकमकरचे संगीत कथेला साजेस आहे. दामोदर पंत च्या प्रमुख भुमीकेत भूमिकेत भरत जाधवने धमाल केली आहे. विजय चव्हाण , अलका कुबल आठल्ये, व्हिलनच्या भूमिकेत सुनील बर्वे यांनी भरतला उत्तम साथ दिली आहे. निखळ मनोरंजनासाठी या श्रीमंताची भेट घ्यायला हरकत नाही.

चित्रपट – श्रीमंत दामोदरपंत
निर्माता – सौरव प्रधान
दिग्दर्शक – केदार शिंदे
संगीत – वैशाली सामंत, अभिराम भडकमकर
कलाकार – भरत जाधव, विजय चव्हाण, अलका कुबल – आठल्ये, सुनिल बर्वे, अभिनय
सावंत, मृणाल दुसानिस, चैत्राली गुप्ते

रेटींग – ***

Leave a Comment