जगभर होते आहे भारतीय टॅलेंटची मागणीˆ:डॉ माशेळकर

पुणे, दि. 27 -भारतीय तरुणांच्यासारखे टॅलेंट आमच्याकडे नाही, अशी चर्चा जगभर अनेक देशात आहे या टॅलेंटचा अधिक विकास झाला तर भारतीय तरुण जगभर अजून उंची गाठतील, असे मत ज्येष्ट शास्त्रज्ज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी अनुबंध प्रकाशनातर्मे डॉ.प्रकाश तुपे लिखित ‘स्पुटनिक ते चांद्रयानम या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी व्यक्त केले. ते म्हणाले, भारताचे पाय कायम जमिनीवर असतील, परंतु झेप मात्र अवकाशात असेल. आपल्या देशात नेहमी नकारात्मक दृष्टीकोनातून बोलले जाते. जागतिक स्तरावर ‘इंडियन टॅलेंटमला मोठी मागणी असल्याचे दिसून येते.

पुस्तकाचे प्रकाशन डॉ. माशेलकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ अणुशास्त्रज्ज्ञ डॉ.एस.आर.गोवारीकर यांनी भूषविले. डॉ. माशेलकर म्हणाले, ‘अवकाश तंत्रज्ञानातील क्लिष्ट गोष्टी या पुस्तकाद्वारे अगदी सोप्या शब्दात मांडण्यात आल्या आहेत. स्पुटनिक ते चांद्रयान दरम्यानच्या अवकाश मोहिमांची माहिती यात आहे.

अवकाश मोहिमांच्या आठवणींना उजाळा देत डॉ. गोवारीकर म्हणाले,‘4 ऑक्टोबर 1957 साली स्पुटनिक बुडाले तेव्हा मी हजर होतो. कम्युनिस्ट राष्ट्राने बनविलेले हे यान प्रत्यक्ष आम्ही डोळ्यांनी पाहिले. त्यावेळी सोव्हिएत युनियनची अमेरिकेलाही भीती वाटू लागली होती. भांडवलशाही विरुद्ध कम्युनिस्ट हे शीत युद्ध यावेळी सुरु झाले. मात्र याच कालावधीत सोव्हिएत युनियनने अवकाश तंत्रज्ञानात मास्टरी दाखविली. त्यानंतर अमेरिकेने 10 वर्षात आमचे यान चंद्रावर पाऊल ठेवेल, असे विधान करुन ते सत्यात उतविले.

Leave a Comment