नोकिया फॅब्लेटचे फोटो लीक

सॅमसंग गॅलॅक्सी नोट तीन व सोनी एक्सपिरीया यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी नोकियाने फॅब्लेट बाजारात आणण्याची तयारी पूर्ण केली आहे. हा स्मार्टफोन नोकियाचा सर्वात मोठा स्मार्टफोन असेल असे यापूर्वीच जाहीर केले गेले असले तरी या उत्पादनाबाबत नोकियाने कमालीची गुप्तता पाळली होती. मात्र चीनच्या वेईबो या साईटवरून या फॅब्लेटचे फोटो लीक झाले आहेत.

नोकियाने गेल्या चार महिन्यात सात मोबाईल हँडसेट बाजारात आणले आहेत. नवा स्मार्टफोन या वर्षअखेरी बाजारात आणला जाईल असा अंदाज असून या स्मार्टफोनचा स्क्रीन सहा इंचाचा असल्याचे वृत्त आहे. नोकियाने आत्तापर्यंत बाजारात आणलेल्या हँडसेट मध्ये हा सर्वात मोठा आहे. त्याची किंमत ३६ ते ४५ हजार रूपयांदरम्यान असेल असेही सांगितले जात आहे. या फॅ ब्लेटमुळे नोकियाला बाजारातील आपले स्थान टिकवून ठेवण्यास मोठी मदत मिळेल असाही दावा केला जात आहे.