टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

हरारे: सलामीचा फलंदाज शिखर धवनच्या शतकाच्या जोरावर झिम्बाब्वे विरुध्दच्या दुस-या वनडे सामन्यात टीम इंडियाने ५८ धावांनी विजय मिळवला. विराट कोहलीच्या टीम इंडियाने झिम्बाब्वे दौ-यात सलग दुसरा विजय साजरा केला. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने २-० अशी आघाडी घेतली.

या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिकुन टीम इंडियाला फलंदाजी दिली होती. टीम इंडियाचे रोहिती शर्मा, विराट कोहली, अंबती रायडू, सुरैश रैना लवकर बाद झाल्यानंतर शिखर धवन आणि दिनेश कार्तीक यांनी भारताचा डाव सावरला. टीम इंडियाच्या या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला तो शिखर धवन. धवनच्या शतकाच्या जोरावर भारताने ५० षटकांत आठ बाद २९४ अशी मजल मारली होती. धवनने १२७ चेंडूंत अकरा चौकार आणि दोन षटकारासह ११६ धावांची खेळी उभारली. धवनचे वन डे कारकीर्दीतले हे तिसरे शतक ठरले. झिम्बाब्वेच्या क्षेत्ररक्षकांनी धवनला दोन जीवदान दिली, तर एकदा जार्विसचा चेंडू नोबॉल ठरल्याने त्याला बाद देण्यात आले नाही. दिनेश कार्तिकनं ७४ चेंडूंत सहा चौकारांसह ६९ धावांची खेळी रचून धवनला छान साथ दिली. धवन आणि कार्तिक यांनी पाचव्या विकेटसाठी १६७ धावांची झुंजार भागीदारी रचली. याच भागिदारीनं दुस-या वन डेला टीम इंडियाच्या बाजूने कलाटणी दिली.

टीम इंडियाने झिम्बाब्वेला विजयासाठी ५० षटकांत २९५ धावांचे आव्हान दिले होते. पण झिम्बाइबेला ५० षटकांत ९ बाद २३६ धावांचीच मजल मारता आली. जयदेव उनाडकटने सुरवातीला टीम इंडिया ४१ धावांत चार फलंदाजांना माघारी धाडून भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. मग, भारताच्या गोलंदाजांनी झिम्बाब्वेला २३६ धावांत रोखले. युवा गोलंदाज जयदेव उनाडकटने चार फलंदाजांना माघारी धाडले. अखेरच्या षटकांत त्याने जर्विस आणि ब्रायन व्हिटोरींना सलग बाद केले.

Leave a Comment