झारखंडमध्ये युरेनियमचा साठा सापडला

जमशेदपूर दि.२७ – जमशेदपूर युरेनियम कार्पोरेशन ऑफ इंडियाने झारखंडमधील सिधभूम जिल्ह्यात जादुगाडा व नरवा पहाड खाणीजवळ एका ठिकाणी युरेनियमचा मोठा साठा सापडल्याचे जाहीर केले आहे. कंपनीचे कार्यकारी अधिकांरी पिनाकी रॉय या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले की पूर्वी असलेल्या युरेनियम खाणीतील एका भागातच हा साठा आढळून आला आहे.

१९६७ मध्ये जादुगोडा येथील युरेनियमची ही खाण सुरू झाली आहे. नवा साठा आढळल्यामुळे आता ही खाण आणखी कांही काळ सुरू ठेवली जाईल असेही रॉय म्हणाले. युरेनियमची ही खाण देशातील पहिली खाण आहे.

Leave a Comment