विराटने केला जलद शतकाचा विक्रम

हरारे – टीम इंडियाचा हंगामी कर्णधार विराट कोहलीने जलद शतकाचा अनोखा विक्रम केला आहे. त्या‍ने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये जलद पंधरा शतके झळकावले आहेत. अशास्वयरूपाचा विक्रम करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. आगामी काळात जर त्यांने या पध्दतीने शतकाची कामगीरी सुरू ठेवली तर त्याला सचिन तेंडूलकरच्या शतकाचा विक्रम मोडता येणार आहे.

बुधवारी झिमाम्बवे विरुध्दच्या सामन्यात कोहलीने शतक झळकावून त्यांनी पंधरावे शतक पूर्ण केले. त्याने १५ शतक झळकवण्यासाठी १०९ सामने घेतले. कोहली पाठोपाठ सईद अन्वरचा नंबर लागतो. अन्वरने १४३ सामन्यांमध्ये पंधरा शतके झळकवली होती. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने १४४ सामन्यांमध्ये पंधरा शतके झळकवली. सध्याचा वेस्टइंडिजचा धडाकेबाज आक्रमक फलंदाज ख्रिस गेलला पंधरा शतकांसाठी १४७ सामने लागले. दक्षिणअफ्रिकेचा हर्शेल गिब्ज सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. त्याने १६१ सामन्यांमध्ये पंधरा शतके झळकवली.

झिम्बाब्वे दौ-यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा विराट कोहली सध्या कर्णधार आहे. विराट कोहलीचा सध्याचा फॉर्म पाहता त्याची विक्रमादित्य सचिन तेंडुलकरबरोबर तुलना केली जात आहे. विराट कोहलीची गुणवत्ता लक्षात घेता भारतीय क्रिकेट आणि चाहत्यांना कोहलीकडून भरपूर अपेक्षा आहेत. आगामी काळात कोहीलीने जर आशेच कामगिरीत सातत्य राहिले तर त्याला सहजपणे मास्टर ब्लाटार सचिन तेंडूलकरचा वनडे मधील ४९ शतकाचा विक्रम मागे टाकता येईल. त्यासोबत तो आस्ट्रलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगचा ३० शतकाचा तर श्रीलंकेचा सनथ जयसुर्याचा २८ शतकाचा विक्रम लवकरच मोडेल असे वाटते.

Leave a Comment