माओवाद वाढण्याचे मुख्य कारण गरीबी – शांता कुमार

गुडगाव – माओवाद वाढण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे गरिबी, अशिक्षितपणा आणि बेरोजगारी असून यासाठी युपीए सरकारचे धोरणच जबाबदार असल्याचे मत गुरुवारी भारतीय जनता पार्टी (भाजपा) चे ज्येष्ठ नेते व हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी व्यक्त केले. गुडगावच्या एका कार्यक्रमात बोलताना कुमार म्हणाले, की माओवाद प्रभावीत क्षेत्रांमध्ये काम करत असलेल्या 15 सदस्यीय समितीच्या अहवालावरुन 95 टक्क्यांपेक्षा जास्त माओवादी गरिबी, अशिक्षितपणा आणि बेरोजगारी यामुळे माओवादी बनले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

युपीए सरकार अन्न सुरक्षा विधेयक 2014 च्या लोकसभा निवडणूकांमध्ये मत सुरक्षित करण्यासाठी अन्न सुरक्षा विधेयकाचा वापर करुन त्यास वोट सुरक्षा विधेयक म्हणून वापरु पहात असल्याचाही आरोप कुमार यांनी यावेळी केला आहे. अन्न सुरक्षा विधेयकाबाबत पुढे बोलताना कुमार म्हणाले, की हे नवीन विधेयकाने लोकांना अन्न पुरेसे अन्न देण्याऐवजी भ्रष्टाचारच वाढीला लागेल. कारण 12000 कोटी वार्षीक खर्च असणारी केंद्र सरकारची मध्यान्ह
भोजनाची योजना संपूर्णपणे निष्कामी ठरली आहे. तसेच युपीए सरकारची धोरणं ही गरीबीच्या विरोधातली आहे. त्यामुळे मनमोहन सिंह यांचे सरकार हे स्वतंत्र भारतातील आता पर्यंतचे सर्वात भ्रष्ट आणि अकार्यक्षम सरकार असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.