हिच्यासाठी कायपण… चित्रपटाच्या सीडीचे प्रकाशन

आराध्या फिल्म्स्च्या आगामी हिच्यासाठी काय पण चित्रपटातील गाण्यांच्या सीडी चे प्रकाशन ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांच्या हस्ते आणि सुप्रसिद्ध व्हयोलीन वादक प्रभाकर जोग यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी निर्मात्या उज्ज्वला पोळ,संगीतकार हर्षित अभिराज,दिग्दर्शक मिलिंद दास्ताने,गीतकार जगदीश पिंगळे उपस्थित होते. चित्रपटाचे कथानक विनोदी असून,भविष्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः कृती केली पाहिजे असा आशय चित्रपटात मांडला आहे. चित्रपटाचे संगीत हर्षित अभिराज यांचे असून चित्रपटात, मंगेश देसाई,भार्गवी चिरमुले,निर्मिती सावंत,विजय चव्हाण,नागेश भोसले यांच्या प्रमुख भूमिका आहेत,गीतांना वैशाली सामंत,जावेद आली,आनंद शिंदे आणि हर्षित अभिराज यांनी आवाज दिला आहे. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले तर सतीश जोशी यांनी आभार मानले.

Leave a Comment