माणसाच्या चेहर्यावर उमटणारे भाव हा त्याच्या मानसिक स्थितीचा अंदाज देतात असे सांगितले जाते. संगणकाचा वापर करून माणसाच्या मनातले खरे भाव ओळखता येतील काय यासाठी जगभर संशोधक संशोधनांत मग्न आहेत. मात्र जपानच्या टोकियो विद्यापीठातील शिगिओ योशिदा या पीएचडीच्या विद्यार्थ्याने अन्य एका विद्यार्थ्यासह एक विशिष्ठ प्रकारचा स्क्रीन तयार केला असून आरशासारख्या असणार्या या स्क्रीनवर युजरची उमटलेली प्रतिमा क्षणात बदलणे शक्य होते आहे.
योशिदाने त्यासाठी युजरची वेबकॅम प्रतिमा युजरलाच दिसेल अशी संगणक प्रणाली तयार केली आहे. मात्र ही प्रतिमा बदलता येते म्हणजे युजर प्रत्यक्ष प्रतिमा पहात असताना जिवणीच्या कडा वर खाली होणे किवा डोळ्याभेावतीचा भाग चेंज होणे या सारखे बदल होऊ शकतात. परिणामी युजरला हसत नसतानाही त्याची हसरी प्रतिमा अथवा रागावलेला नसतानाही किवा चिंताग्रस्त नसतानाही त्या मूडच्या प्रतिमा दिसू शकतात.
संशोधकांना मात्र या नव्या शोधामुळे चिंता निर्माण झाली आहे. त्यांच्या मते या शोधाचा गैरवापर करून ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक आपली उत्पादने ग्राहकाच्या गळ्यात बांधू शकतील. उदाहरण द्यायचे तर कपड्याच्या शोरूममध्ये आरशांऐवजी अशा प्रतिमा दाखविणारी प्रणाली असलेले स्क्रीन बसविले गेले तर एखादा कपडा ट्राय करून बघताना युजरच्या चेहर्यावर म्हणजे प्रतिमेतील चेहर्यावर आनंदाचे भाव दिसू शकतील व परिणामी न आवडलेला कपडाही युजर खरेदी करेल. म्हणजे हे स्क्रीन युजरची चक्क फसवणूक करतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.